समता विचारमंचतर्फे कवि संमेलन उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । येथील समता विचारमंचतर्फे अजिंठा हौसिंग सोसायटीमध्ये विद्रोही कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.

या कवि संमेलनाच्या अध्यक्षस्थानी व्ही.डी. बिर्‍हाडे होते. प्रारंभी राजमाता जिजाऊ भोसले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर विविध कविंनी आपापल्या रचना सादर केल्या. यात पुष्पा साळवे यांनी सल अजूनही माझ्या मनात सलत आहे… विजय पवार यांनी माचीस या कवितेतून खिसेसे निकली माचीस है या कविता सादर केल्या. प्रकाश बारी यांनी अजूनही मी माणूस शोधतो आहे,तर ईश्‍वर वाघ यांनी विषमतेनेे बुरसटलेल्या होत्या जाती हा पोवाडा सादर केला. आर.जे. सुरवाडे यांचे भीमाचे वरदान बाबा भूख तुझ्यासाठी लहान आणि दिलीप सपकाळे यांनी काय साध्य केले.. तुम्ही गणपतीला दूध पाजून.. ही कविता सादर केली. विलास बोरीकर यांनी सर्वांना समान वाट्याची घोषणा झाली. तर भगवान भटकर यांनी काळ्या रात्री उपाशी कुत्री ही कविता सादर केली. याशिवाय, एस.के.सोनवणे व अन्य विविध कवयित्रींनी कविता सादर केल्या. बळवंत भालेराव यांनी प्रास्ताविक केले. वसंत सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले.

Add Comment

Protected Content