काँग्रेसने माझा छळ केला- पंतप्रधान

नवी दिल्ली वृत्तसंस्था । गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम पाहत असताना काँग्रेस आणि काँग्रेसच्या इशार्‍यावर चालणार्‍या व्यवस्थेने सलग १२ वर्ष मला त्रस्त करून छळ केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते भाजपाच्या राष्ट्रीय संमेलनात उपस्थितांना संबोधित करत होते.

भाजपाच्या संमेलनात संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका करतांना भावनिक मुद्द्याचा आधार घेतला. ते म्हणाले की, मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेस, त्याचे सहकारी, त्यांच्या इशार्‍यावर चालणारी व्यवस्था, तसेच त्यांच्या रिमोटवर चालणारे नेते आणि अधिकार्‍यांनी मला अनेक मार्गांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांनी मला छळण्याची एकही संधी सोडली नाही. २००७ साली तर काँग्रेसचे एक मोठे नेते गुजरातमध्ये प्रचार सभेला संबोधित करताना म्हणाले होते की, मोदी काही महिन्यांत तुरुंगात जाईल. तर विधानसभेमध्ये काँग्रेसचे नेते भाषण द्यायचे की, मोदींनी तुरुंगात जायची तयारी करावी. आता मुख्यमंत्री आहात तर तुरुंगांचा साफसफाई व्यवस्थित ठेवा कारण तुम्हाला पुढचे जीवन तुरुंगातच काढायचे आहे. असे मोदींनी सांगितले.

दरम्यान, यूपीए सरकारने मोदींना फसवा व अमित शाह यांना तुरुंगातच टाका, असा अजेंडा राबवला होता, हे समोर आले असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.

Add Comment

Protected Content