दिल्ली सरकारने लागू केल्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजधानीतील आम आदमी पक्षाचे सरकार स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतीमालाला भाव देणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.

 

यानुसार पिकांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय दिल्ली सरकार घेईल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांनी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत म्हणून गहू या पिकासाठी २६१६ रुपये तर इतर धान्यासाठी २६६७ रुपये किमान आधारभूत किंमत म्हणजे एमएसपी लागू करणार असल्याचे प्रस्तावित आहे, असे म्हटले आहे. तसेच याबाबत जनेतेच्या सूचनांचेही स्वागत केले जाईल, असेही त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे. त्यासाठी [email protected] किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर आपल्या सूचना पाठविण्याचे आवाहन केले आहे.

Add Comment

Protected Content