सुभाषवाडी येथे शेतकर्‍याच्या खळ्याला आग

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथे कुठलेही कारण नसतांना गावातीलच व्यक्तीने शेतकर्‍याच्या खळ्यातील दादरच्या चार्‍याची १० ट्रॅक्टर एवढी ३५ हजारांची कुट्टी व २० हजारांचे ठिबकचे पाईप व पत्रे असे एकूण ५५ हजारांचे साहित्य जाळून नुकसान गेल्याची घटना घडली. याप्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सुभाषवाडी येथील साहेबराव भवरलाल राठोड वय ४० यांचे गावातच खळे आहेत. या खळ्यात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये शेतीसाठी लागणारे साहित्य व गुरांसाठी लागणारा चारा राठोड हे ठेवत असतात. दरम्यान गावातीलच गोपीचंद दुबा चव्हाण याने खळ्याला आग लावून या आगीत खळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला ३२ हजार रुपये किंमतीच्या चार्‍याची कुट्टी, २० हजारांचे ठिबकचे पाईप व ४० पत्रे जळून नुकसान झाले. असे शेतकरी राठोड यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार नमूद आहे.  शेतकरी राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गोपीचंद दुबा चव्हाण रा. सुभाषवाडी याच्याविरोधात आग लावून नुकसान केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस नाईक स्वप्निल पाटील हे करीत आहेत.

Protected Content