जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ सुरू असलेल्या सट्टयाच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवार 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ सट्टा दुकानाचा खेळ खेळला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे साहेब फौजदार रवी नरवाडे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश मेंढे तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश भांडारकर पोलीस नाईक किशोर निकुंभ पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने शनिवारी सायंकाळी सट्टयाच्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी चार हजार आठशे दहा रुपयांची रोकड व सट्टा जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक विजय शामराव पाटील यांच्या फिर्यादीवरून सट्टा जुगाराचा खेळ खेळणाऱ्या नितीन मधुकर चौधरी वय 43 याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.