हिताची ऑटोमोबाइल्सच्या कंत्राटी कामगारांचा उपोषणाचा इशारा (व्हिडिओ)

जळगाव,  प्रतिनिधी ।  हिताची  ऑटोमोबाइल्सच्या कंत्राटी कामगारांनि आज कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केल्यानंतर उद्यापासून साखळी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. 

 

या कंत्राटी कामगारांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , या कंपनीत कायम कामगारांना ६५ ते ७० हजार रुपये दरमहा वेतन  आहे आणि २० ते २५ वर्षांपासून राबणारे कंत्राटी कामगार मात्र सध्या फक्त १२ ते १५ हजार रुपयांवर काम करत आहेत व्यवस्थापन उत्पादन वाढीसाठी तगादा लावून कंत्राटी कामगारांना राबवून घेत आहे मात्र कायम कामगारासारखा पगार आणि सुविधा मागितल्या तर पोलीस कारवाई किंवा सेवा अंतर्गत कारवाईचा सतत दबाव टाकत आहे असा आरोप या कामगारांनी केला आहे यापूर्वी झालेले आंदोलन पुण्यातील एच आर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले होते त्यावेळी बांभोरी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीही मध्यस्थीसाठी पुढाकार घेतला होता. आता मात्र आमच्या मागण्या पदरात  पाडून घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही.  दिवसेंदिवस आंदोलन तीव्र करू असा निर्धार या कामगारांनी केला आहे. 

उद्यापासून साखळी उपोषण 

आता उद्यापासून हे कंत्राटी कामगार टप्प्याटप्प्याने साखळी उपोषण करणार आहेत व्यवस्थापनाची अन्याय करणारी भूमिका सुधरल्याशिवाय आता माघार नाही असेही त्यांनी सांगितले. 

कामगारांना मनसेचा पाठींबा 

दरम्यान या कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा असल्याचे  सांगत  कामगारांनी व्यवस्थापनाच्या किंवा पोलिसांच्या दबावाला भीक न घालण्याचे आवाहन मनसेचे जिल्हा संघटक राजेंद्र निकम यांनी केले आहे या कामगारांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मनसेच्या कामगार आघाडीच्या राज्यपातळीवरील पदाधिकाऱ्यांना आम्ही लक्ष घालायला सांगू ,  त्यांना स्थानिक पातळीवरही आवश्यक ती  सगळी मदत करू असेही राजेंद्र निकम यांनी सांगितले .

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/951725842269404

 

Protected Content