सचिन पायलट यांच्या गटाला २४ जुलैपर्यंत दिलासा; न्यायालयाकडून कारवाई न करण्याचे सभापतींना आदेश

जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने २४ जुलैपर्यंत दिलासा देत सचिन पायलट यांच्या गटावर सभापती सी.पी.जोशी यांना कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आता या बंडखोर आमदारांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

 

 

राजस्थानच्या विधानसभा अध्यक्षांनी पायलट यांच्यासह १९ आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये तुमचे सदस्यत्व रद्द का करू नये?, अशी नोटीस बजावली होती. त्यावर उत्तर द्यायला त्यांनी आमदारांना एका दिवसाची संध्याकाळपर्यंतची वेळ दिली होती. त्यानंतर या आमदारांवर लगेच कारवाई करण्याची शक्यता होती. पण या नोटिशीला पायलट व समर्थकांनी न्यायालयात जे आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्तींनी मंगळवार संध्याकाळपर्यंत अध्यक्षांनी या आमदारांबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश दिले होते. दरम्यान, या प्रकरणावर आज पुन्हा सुनवाई झाली. त्यानुसार २४ जुलैपर्यंत कारवाई न करण्याचे विधानसभा अध्यक्षांना न्यायालयाने आदेश दिले आहेत.

Protected Content