सकल लेवा पाटीदार समाजाचे युवक-युवती परिचय संमेलन

जळगाव, प्रतिनिधी | अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ, बहिणाबाई ब्रिगेड आणि लेवा सखी घे भरारी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने लेवा पाटीदार समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींचे परिचय संमेलनाचे कुटुंब नायक रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. २ जानेवारी २०२२ रोजी लेवा भवन येथे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी विवाहोत्सुक युवक-युवतींचे कौटुंबिक व शैक्षणिक माहिती असलेली परिचय पुस्तिका चे देखील प्रकाशन करण्यात येणार आहे.

सकल लेवा पाटीदार समाजाचे युवक-युवती परिचय संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, खासदार रक्षाताई खडसे , आमदार शिरीष चौधरी , आमदार सुरेश भोळे , महापौर जयश्रीताई महाजन, अॅड. सौ रोहिणीताई खडसे खेवलकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्ष नेता सुनील महाजन, बहिणाबाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई कोल्हे, मनपा सभागृह नेते ललितभाऊ कोल्हे, अॅड. प्रकाश व्ही पाटील , उमेशभाऊ नेमाडे, प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे, लेवा सखी घे भरारी चे अध्यक्ष अॅड. भारती ढाके, औरंगाबाद मित्रमंडळाचे अध्यक्ष मधुकर सरोदे ,शरद महाजन व पं. सदस्य ज्योतीताई महाजन, पं. सदस्य जागृतीताई चौधरी, डी. डी. चौधरी, राजेश चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे यांचे सह समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहतील. संमेलन मेळाव्याचे नियोजनासाठी नुकतीच बहिणाबाई ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष श्रीमती आशाताई कोल्हे यांचे निवासस्थानी बैठक संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष प्रकाशदादा पाटील व प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे यांचे मार्गदर्शनाखाली व कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकास गठित समित्यांमध्ये व विहित कामे सुसूत्रतेने पार पाडण्यासाठी खालील प्रमाणे जबाबदारी सोपविण्यात आले.

स्वागत समिती: हर्षा बोरोले, सोनाली बोरोले, पुष्पा पाटील, सोनाली पाटील, भावना महाजन.
व्यवस्थापन समिती: निखील रडे, सागर महाजन, विवेक जावळे, अविनाश भोळे, तृप्ती आटाळे, वैशाली झोपे.
भोजन समिती:अतुल महाजन, प्रदिप रोटे, योगेश इंगळे ,सुरेश फालक, प्रणित नारखेडे,धिरज पाटील, शुभम चिरमाडे.
परिचय संमेलन समिती: रजनी महाजन, साधना लोखंडे, प्रा. संध्या महाजन, डॉ. सीमा गाजरे, स्मिता पाटील, वनिता चौधरी.
नोंदणी समिती: वैशाली कोळंबे, भारती चौधरी, कांचन राणे, सुनिता रोटे ,अंजली नारखेडे.
स्टेज व्यवस्थापन व नियोजन समिती: गणेश चौधरी, पुष्पा पाटील, भावना चौधरी, जयाताई राणे.
सूत्रसंचालन: सुनीता येवले, जया राणे,अनिता पाटील, सविता भोळे, मनीषा चौधरी तरी नियोजित मेळावा शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी सर्वानुमते ठरविण्यात येऊन इतर महत्वाच्या मुद्द्यावर देखील यावेळी चर्चा करण्यात आली.

Protected Content