जम्मू-काश्मिरात दहा दहशतवादी ठार : जवानांची धडक कारवाई

नवी दिल्ली वृत्तसंस्था | जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सहा दहशतवाद्यांना ठार मारण्यात आपल्या जवानांना यश आलं आहे. तर या चकमीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.

काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनागमधील नवगाम परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.  दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले.  हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते असेही विजय कुमार यांनी सांगितले.

दक्षिण काश्मीरमधील दोन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काल सायंकाळपासून या कारवाया सुरू करण्यात आल्या होत्या.  सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून त्यापैकी चौघांची ओळख पटली आहे. यातील दोघे पाकिस्तानी असून इतर दोघे स्थानिक आहेत. इतर दोन दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू  आहे.

दरम्यान, या चकमकीमध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या कर्मचार्‍याला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तान सीमेवर कुरापती काढत असतांना या कारवाईमुळे भारताला मोठ्या प्रमाणात यश लाभल्याचे दिसून येत आहे.

 

Protected Content