संसदेत कायदे रद्द झाल्यावरच आंदोलन मागे : टिकैत

नवी दिल्ली वृत्तसंस्था | पंतप्रधान मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयाचा स्वागत करतांना शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी जोवर हे कायदे प्रत्यक्षात संसदेत रद्द होत नाही तोवर आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या अनुषंगाने शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून आंदोलन आताच मागे घेणार नसल्याचं म्हटलं आहे. राकेश टिकैत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, आंदोलन तात्काळ वापस घेतलं जाणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत, ज्या दिवशी संसदेत कृषी कायदे रद्द केले जातील. तसेच सरकार चडझ सह शेतकर्‍यांच्या अन्य मुद्द्यांवर देखील चर्चा करेल, असं राकेश टिकैत म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे. तर या निर्णयाचा आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला लाभ होणार की हानी याबाबतची चर्चा देखील सुरू झालेली आहे.

Protected Content