बिहारमध्ये राजकीय भूकंप शक्य-संजय राऊत

 

मुंबई : वृत्तसंस्था । बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार अस्वस्थ असतात तेव्हा ते चटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. दगाफटका करण्यात ते माहिर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये राजकीय भूकंप होऊ शकतो अशी शक्यता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवली आहे.

एवढंच नाही तर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचं पिक येणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सद्यस्थितीत नितीश कुमार यांनी बिहारचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलं तर त्यांना भाजपाचं मांडलिक व्हावं लागेल. नितीश कुमार यांच्या स्वभावाला ते साजेसं नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

. नितीशकुमारांनी माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत दगाफटका केला. राजदचे नेते लालूप्रसाद यादव आणि ते तर सत्तेत होते लालूप्रसाद यादव यांच्यासोबतही त्यांनी दगा केला. एनडीएलाही त्यांनी दगा दिला होता. त्यामुळे नितीशकुमार नेमकं काय करतील याची शाश्वती आत्ता तरी देता येत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Protected Content