मविआच्या जागावाटपात जळगावची जागा ठाकरे गटाला तर रावेरची शरद गटाला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास‎ आघाडीच्या नेत्यांत जागा वाटपाच्या चर्चेच्या‎फेऱ्या सुरू झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील‎ रावेरची जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला‎तर जळगाव लोकसभेची जागा शिवसेनेच्या‎ ठाकरे गटाला देण्यात आल्याची माहिती आहे.‎

या वृत्ताला शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख‎ संजय सावंत यांनी दुजोरा दिला. लोकसभेसाठी दोन्ही मतदारसंघ भाजपसाठी बालेकिल्ला‎ राहिले आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी‎ मविआची आठवडाभरापासून जागा वाटपावर ‎चर्चा सुरू आहे. चार जागांबाबत एकमत होत ‎नसल्याने त्यावर पुन्हा पुन्हा चर्चा केली जात‎आहे. त्यात जळगाव लोकसभेच्या जागेचाही‎समावेश होता. शुक्रवारी चर्चेत जळगाव‎ लोकसभेची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला ‎सोडण्यावर एकमत झाल्याचे सांगण्यात आले.‎

 

Protected Content