संयुक्त राष्ट्र संघटनेकडून भारताची प्रशंसा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच इतर देशांना कोरोना लसींचे लाखो डोस पुरवणाऱ्या भारताचे संयुक्त राष्ट्रांनी कौतुक केलं आहे.

 

भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शांतीदुतांसाठी लसपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त राष्ट्राने भारताच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये भारत  जागतिक स्तरावर नेतृत्व करत असल्याचं सांगत भारताला ग्लोबल लीडर असं म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या सचीव टी. एस. तिरुमूर्ती यांनी केला आहे.

 

कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये भारत ग्लोबल लीडर म्हणून काम करत आहे. कोवॅक्स सेवेला बळकटी देण्यासाठी भारत जगभरातील वेगवेगळ्या देशांना लसीचा पुरवठा करत आहे. जगभरात लसी पुरवणाऱ्या भारताचे आम्ही आभार मानतो,” असं संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे. मोदी सरकारने लसींसंदर्भात जागतिक स्तरावर मदत करण्यासाठी कायमच तयार असल्याचे आधीच स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत भारताने ५० हून अधिक देशांना लसींचा पुरवठा केलाय. त्यामुळेच संयुक्त राष्ट्राने मोदी सरकारच्या या प्रयत्नांची दखल घेत भारताला ‘ग्लोबल लीडर इन वॉर अगेन्सट कोरोना’ असल्याचे म्हणत शब्बासकी दिलीय.

 

गुट्रेस यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचेही आभार मानले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारताने मागील आठवड्यापर्यंत  २२९.७ लाख लसी निर्यात केल्या आहेत. पहिल्या दिवशीच भारतामध्ये २० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. भारताने संयुक्त राष्ट्रांसाठी काम करणाऱ्या हजारो व्यक्तींचेही लसीकरण केलं आहे. केंद्र सरकारकडूनलसीकरणासंदर्भातील कोविन नावचे अ‍ॅप्लिकेशनही लॉन्च करण्यात आलं आहे.

 

भारताने सध्या कोव्हॅक्सीन आणि कोविशिल्ड या दोन लसींच्या वापराला परवानगी दिली आहे.  ओणान, निकारागुआसह  भारत लवकरच आफ्रीकेमधील देशांसाठी एक कोटी डोस पाठवणार आहे. १० लाख डोस केवळ संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पाठवण्यात येतील  देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर भारत लसीकरणाच्या बाबातील खरोखरच नेतृत्व करत असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे.

Protected Content