धरणगाव तालुक्यात आज आढळले ४३ कोरोनाबाधित !

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या संशयित रूग्णांचा स्वॅबचा अहवाल आज दुपारी प्रशासनाला प्राप्त झाले. यात तालुक्यात ४३ कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यात आज आढळून आलेल्या अहवालात एकुण ४२ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. यात धरणगाव शहरात १२ तर उर्वरित ३१ रुग्ण तालुक्यातील ग्रामीण भागात आढळून आले आहेत. त्यात पाळधी बुद्रुक-३,पष्टाणे खुर्द-१,वराड खुर्द-१०,मुसळी, पोखरी,भोद बु, पथराड, वंजारी खपाट, सोनवद, बोरगाव बु येथे प्रत्येकी एक तर साळवा येथे ७ रुग्ण आढळून आले आहेत. हेडगेवार नगर-१, गौतम नगर-२, कासार गल्ली, मेनरोड बाजार, परिहार चौक, भावे गल्ली, प्रत्येकी एक तर गणा बाप्पा नगर-२, पारधी वाडा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आज एकूण ४३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. धरणगाव तालुक्यात एकूण रूग्ण संख्या ७४६ झाली असून यापैकी ३४ जणांचा मृत्यू तर ५३० जण बरे होऊन घरी पाठविले आहे. तर उर्वरित १८२ जण उपचार घेत आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. दुसरीकडे बालकवी ठोंबरे विद्यालय, कोविड सेंटर आणि लिटील ब्लाझम स्कूलमध्ये संशयिताना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

Protected Content