संचारबंदी : गरीबांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्रात कोरोनाच्या पादुर्भाव वाढू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात ३० एप्रिलपर्यत लॉक डाऊन जाहीर केले आहे. याकाळात गरिबांना रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. याची जाणीव ठेवून मेहतर समाजाचे कार्यकर्ते भब्बू भैया जावळे हे अशा गरजुंना धान्याचे वाटप केले.

शहरातील गरजुंना धान्य, तांदूळ, डाळ, तेल, पीठ, मीठ, चहापावडर,साखर आदिवास्तूंचे भब्बु भैया हे वाटप करत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत नितिन जावळे, राज जावळे, रवि खरारे विक्की हंसकर, शुभम घारू, धीरज जावळे, अविनाश जावळे तथा समस्त जावळे परिवार आणि मेहतर समाजातर्फे हे कार्य करण्यात येत आहे.

Protected Content