श्री संत मुक्ताई मंदिर कोथळी येथे आबालवृध्द भाविकांनी घेतले दर्शन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आषाढी एकादशी निमित्त आज कोथळी येथील श्री संत मुक्ताई मंदिरात हजारो भाविकांनी दर्शन घेतले.

आज आषाढी एकादशी निमित्ताने भाविकांची मुक्ताई मंदिरात कोथळी येथे चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच संत मुक्ताईला मोसंबी फळांची चांगल्या प्रकारे आरास करण्यात आली. कोथळी येथील रहिवासी असलेले रघुनाथ सिताराम चौधरी यांच्या शेतामधील मोसंबीच्या फळांची संत मुक्ताईला आरास करण्यात आलेली आहे. संत मुक्ताई मंदिरामध्ये व शहरांमध्ये सकाळपासून चांगल्या प्रकारे भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. अनेक दिंड्यांसहित भाविकांची मुक्ताईनगर उपस्थिती लाभलेली आहे. तसेच संत मुक्ताई चा आरास लावण्यात आलेला मोसंबीचा सुंदर देखावा पाहून भाविक प्रसन्न शांततेच्या वातावरणात दर्शनाचा लाभ घेत आहेत.

Protected Content