पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा जहागिरीचे शेवटचे जहागीरदार, तथा खानदेश लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष, सेनाबारासहस्री श्रीमंत सरदार एस. के. पवार यांच्या आज दि. १० फेब्रुवारी रोजी पुण्यतिथीनिमित्ताने पाचोरा कन्या विद्यालयात आदरांजली अर्पण करण्यात आली.
श्रीमंत सरदार एस. के.पवार यांना आदरांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भारती बागड ह्या होत्या. प्रा. प्रतिभा परदेशी यांनी श्रीमंत सरदार शिवराव कृष्णराव पवार यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. उपस्थितांनी श्रीमंत पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी प्रा. रविंद्र चव्हाण, प्रा. प्रतिभा परदेशी, प्रा. अंकिता शेळके, प्रा. संगीता राजपूत, प्रा. प्रतिभा पाटील, शिवाजी शिंदे माया सूर्यवंशी, अंबालाल पवार, आर. ओ. पाटील, कल्पना पाटील, प्रणाली टोनपे, अभिषेक लांडगे, शरद साळुंखे, श्रीमती बडे, वरिष्ठ लिपिक शिवाजी बागुल, शिवराम पाटील, धनराज धनगर, आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हेमराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर उपस्थितांचे आभार प्रणाली टोनपे यांनी मानले.