शोपियांमध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा

 

श्रीनगर : वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत 5 दहशतवादांच्या खात्मा करण्यात आलाय. 

 

या चकमकीत दहशतवादी संघटना अंसार गजवातुल हिंदचा प्रमुख इम्तियाज अहमद शाह याच्यासह 5 दहशतवादी ठार झाले आहेत.  हे स्थानिक दहशतवादी होते. मृतांमधील 2 दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीन, एक लष्कर-ए-तोयबा तर 2 दहशतवादी या  संघटनेचे होते. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा पार पाडली जाईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी  सांगितलं.

 

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बाबा मोहल्ला परिसरात दहशतवाद अशल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर परिसराला घेराव घालण्यात आला आणि नाकाबंदी करण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरु केला. सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिलं.

 

 

गुरुवारी रात्री झालेल्या चकमकीनंतर शोपियांमधील मशिदीत लपलेल्या दोन दहशतवाद्यांना पकडण्याचा प्रय़त्न सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लपलेल्या दहशतवाद्याचा भाऊ आणि स्थानिक इमाम साहेप यांना दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगण्यासाठी मशिदीत पाठवण्यात आलं. मशिदीचं नुकसान टालण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुलवामाच्या त्राल मध्ये शुक्रवारी सकाळी एका चकमकीत दोन अज्ञात दहशतवाद्यांनाही सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केलं.

 

यापूर्वी शोपिंया जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांनी एका सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला होता. मात्र, त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दहशतवाद्यांनी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांच्या आसपास शोपिया शहरातील इमामसाहिबमध्ये पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबारी केला होता. गोळीबारानंतर त्या परिसरात मोठा गोंधळ उडाला. त्याचा फायदा घेत हे दहशतवादी फरार झाले होते.

Protected Content