एकुलती येथे उपप्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कोरोना चाचणी शिबीर

शेंदुर्णी प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या एकुलती गावात ग्रामपंचयत आणि उपप्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दोन दिवसीय कोरोना चाचणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यात ८० टक्के ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.

यावेळी आरोग्य उपकेंद्र संचालक डॉ. स्वप्निल बारी, सरपंच सुनिता पाटील, उपसरपंच पंकज पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसवेक, तलाठी, पोलीस पाटील दीपक पाटील, रामकृष्ण पाटील, माधव पाटील आदी उपस्थित होते. गावातील वयोवृद्ध पुरुष, महिला तरूण वर्ग या सर्वांनी त्यामध्ये सहभाग नोंदवून कोरोना चाचणी करून घेतली. जवळपास 80 टक्के लोकांनी कोरोना चाचणी करून घेतली. यामध्ये अंगणवाडी सेविका प्रतिभा कापसे, रामकृष्ण भिवसने आरोग्य सेवक, कोकाटे आरोग्यसेविका, मालती कोकाटे, आशा वर्कर वंदना सुरवडे आशा वर्कर, देवकाबाई पाटील मदतनीस , मीना नाव्ही मदतनीस यांनी घरोघरी जाऊन कोरोना चाचणी विषयी मार्गदर्शन केले व कोरोना चाचणी करून घेतल्या. डॉ. स्वप्नील बारी यांनी नियमित मास्क वापरावे, हात-पाय  स्वच्छ धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, नियमित चाचणी करून घेणे. याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले. 

यशस्वीतेसाठी करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक देविदास महाजन, युवराज पाटील, भावलाल पाटील, दगडू पाटील, संजय पाटील, सिताराम पाटील, रामधन पाटील, प्रभाकर कापसे, योगेश पाटील, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र संचालक डॉक्टर स्वप्नील बारी यांनी परिश्रम घेतले. या शिबीरात 5 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यांना पुढील उपचारार्थ मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र डॉ. स्वप्नील बारी व ग्रामपंचायत तर्फे सर्व गावकऱ्यांचे आभार मानण्यात आले.

Protected Content