पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकऱ्याच्या शेतातून १५ शेळ्यांची चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी नगरदेवळा येथून अटक केली आहे. याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रविंद्र पंडित पाटील यांच्या शेतातून ५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री चार चाकी वाहनातून अज्ञात चोरट्याने १५ शेळ्यांची चोरी केली होती. याबाबत रविंद्र पाटील यांनी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अज्ञात चोरट्या बाबत पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिसांना शेळ्या चोरणारा चोर नगरदेवळा येथील असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनतर पोलिसांनी मध्यरात्रीच नगरदेवळा येथे जावून अंनिस हकिम खाटीक यास झोपेतून उठवून पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यास पोलिसी खाक्या दाखविताच त्याने रविंद्र पाटील यांच्या शेतातून ६० हजार रुपये किंमतीच्या १५ शेळ्या विविध ठिकाणी बाजारात जावून विकल्याची कबुली दिली.
पिंपळगाव पोलिसांनी डोंगरगावातील रवींद्र पंडित पाटील यांच्या १५ बकऱ्या अज्ञात चोरट्याने दि. ५ रोजी चोरून नेल्या होत्या त्याबाबत पिंपळगाव पोलिस स्टेशन येथे गु. र. नं. २०७ / २०२२ भा. द. वि. ४६१ ध ३८० अन्वये गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा तपास करून त्यातील आरोपी अनिस हकीम खाटीक यास अटक करण्यात आली असून त्यांचेकडून बकऱ्या विक्री केलेल्या ६० रुपयांपैकी ३५ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे. आरोपीस पाचोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. यानंतर त्यास न्यालयीन कोठडी देण्यात आली आहे. इतर आरोपी यांचा सदर प्रकारच्या इतर चोऱ्यांचा तपास सुरू आहे. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलिस नाईक गोकुळ सोनावणे, पोलिस नाईक रविंद्र पाटील, पोलिस हवालदार किरण ब्राम्हणे, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, पोलिस कॉन्स्टेबल पंकज सोनावणे, पोलिस कॉन्स्टेबल मुकेश लोकरे यांनी केली आहे.