गोदावरी फाउंडेशनतर्फे ३ दिवस मोफत आरोग्य तपासणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लेवा पाटीदार ग्लोबल सोशल फाउंडेशन व लेवा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज एग्रीकल्चर जळगाव यांच्या वतीने ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सागर पार्क मैदानात लेवा पाटीदार बिजनेस एक्स्पो २०२२ आयोजित केला आहे. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत हा उपक्रम होईल. यात गोदावरी फाउंडेशनतर्फे ३ दिवस मोफत आरोग्य तपासणीचाही समावेश आहे.

या प्रदर्शनात ऑटोमोबाइल्स, ट्रॅक्टर्स, मॅन्युफॅक्चरर्स, सोलर, कृषी, बचतगट, पेंट्स, होम डेकाट फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, होम ऍप्लिकेबल, एफएमसीजी प्रोडक्ट्स, फूड मॅन्युफॅक्चटिंग, बिल्डर्स, काँट्रॅक्टर्स, लँड डेव्हलपर्स इत्यादी उत्पादने उद्योग-व्यवसाय व सेवांविषयीचे अनेक खरेदी सुलभ स्टॉल्स राहणार आहेत. तीन दिवस चालणार्‍या या बिजनेस एक्स्पो मध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुंबईपुण्याच्या बॅण्ड्स सोबतच ग्रामीण भागातील उद्योजकांची उत्पादने व कलाकुसरही अनुभवायला मिळणार आहे. यासोबतच प्रदर्शनाला भेट देणार्‍या नागरिकांचा अनुभव अधिक आनंददायी व्हावा यासाठी प्रदर्शनी परिसरातच खवय्यांसाठी खास विविध खाद्यपदार्थाची रेलचेल असलेली खाऊगल्ली असेल व याठिकाणी खाद्यपदार्थाची अनेक दुकाने थाटलेली असतील. याशिवाय नागरिकांबरोबर आलेल्या लहान-लहान बालकांच्या मनोरंजनासाठी त्यांना खेळण्याकरिता आकर्षक किडस झोनदेखील असेल. याठिकाणी मुले खेळण्याचा आनंद लुटू शकतील.शिवाय या तीन दिवसात देशभक्तीपर गायन व नृत्य,भारुड, वह्या, ओव्या व अभंग गायन, बहिणाबाईंच्या कवितांवर स्पर्धा, पथनाट्य इत्यादींच्या माध्यमातून खान्देशच्या संस्कृतीचे दर्शनही घडणार आहे.

या लेवा पाटीदार बिजनेस एक्स्पोचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य व आकर्षण म्हणजे या प्रदर्शनीत गोदावरी फाउंडेशनच्यावतीने प्रदर्शनीला भेट देणाया इच्छुक नागरिकांसाठी तीनही दिवस मोफत आरोग्य तपासणीची सविधादेखील करण्यात आलेली आहे. यावेळी रक्‍तदाब, मधुमेह, बीएमआय, ईसीजी, बीएसएल या चाचण्यांसोबत २-डी इकोपर्यंतच्या टेस्टही मोफत केल्या जाणार आहेत. म्हणजेच ही प्रदर्शनी म्हणजे खरेदीच्या आनंदसोबतच आरोग्याचा मोफत आढावाही घेण्यात येणार आहे. प्रदर्शनाला भेट द्यावीच. याचे एक आणखी आकर्षण म्हणजे येथे भेट देणार्‍या नागरिकांमधन लकी डॉ काढला जाणार आहे. महिलांसाठी खास दर तासाला लकी ड्रॉ काढला जाणार आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. गोदावरी फाउंडेशन हे या एक्सपोचे मुख्य प्रायोजक असून वेगा केमिकल्स प्रा.लि. सुदर्शन पेपर ६ प्रॉडक्टस, मधुटनेह परिवाट, चौधरी टोयोटा, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व दि जळगाव पीपल्स को.ऑप. बँक हे सहप्रायोजक आहेत. तर चॅनल पार्टनर म्हणून खोटाल गृप, सोनी एजन्सीज, कृष्णा पेक्टिन्स प्रा. लि. स्टाट फॅब्रिकेटर्स जीवनज्योती कॅन्सट हॉस्पिटल जळगाव इ.चे सहकार्य लाभले आहे.

जळगावात प्रथमच होत असलेल्या या विविध वैशिष्ट्यपूर्ण लेवा पाटीदार बिजनेस एक्स्पोला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन उद्योजकांना प्रेरणा द्यावी व आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी अ‍ॅड. पुष्कर नेहते, महेश चौधरी, चंदन अत्तरदे, चंदन कोल्हे, नितीन इंगळे, बिपीन पाटील, भूषण बढे, रुपेश सरोदे, हितेंद्र धांडे, अभिजित महाजन उपस्थित होते.

Protected Content