पारोळा प्रतिनिधी । शेतात रात्री पाणी भरणा करण्यासाठी गेलेल्या तरूणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास तालुक्यातील शेळावे येथे घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, ज्ञानेश्वर संतोष सांगळे (वय-24) रा. शेळावे ता.पारोळा हा स्वत:च्या शेतात मोहाडी ता. पारोळा शिवारातील शेतात भरणा करण्यासाठी 27 रोजी सायंकाळी 7 वाजता गेला होता. आज 28 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला. कुटीर रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. गोकुळे सांगळे यांच्या खबरीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र रावते हे करीत आहे