सीट भरण्याच्या कारणावरून रिक्षाचालकाला बदडले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खंडेराव नगरात रिक्षात सीट भरण्याच्या कारणावरून दोन जणांनी रिक्षा चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुरुवार २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील खंडेराव नगरातील रेल्वे बोगद्याजवळ रिक्षा स्टॉप आहे. या ठिकाणी रिक्षा चालक शकील अहमद पिंजारी (वय-४७) रा. खंडेराव नगर यांनी गुरुवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता वाजता त्याची रिक्षा लावली होती. त्यावेळी रिक्षातील सीट भरण्याच्या कारणावरून राहुल शरद मोरे रा. खंडेराव नगर व इतर एका अनोळखी व्यक्तीने रिक्षाचालक शकील पिंजारी याला चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत दमदाटी केली. यामध्ये रिक्षा चालक शकील पिंजारी हे जखमी झाले आहे. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेबाबत दुपारी ३ वाजता रिक्षा चालक शकील पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल शरद मोरे रा. खंडेराव नगर आणि एक अनोळखी व्यक्ती अशा दोन जणांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहे.

Protected Content