शेतकऱ्यांसाठी खुशखबर : शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार १२ हजार रूपये

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पव विधानसभेत सादर केला आहे. सादर केलेल्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. अवघ्या एका रूपयात शेतकऱ्यांना पीक विमा घेता येणार आहे. याचा हप्ता राज्य सरकार भरणार असून नमो शेतकी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १२ हजार रूपये प्रत्येकी देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी ९ मार्च रोजी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प आहे. ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित हा अर्थसंकल्प आहे, असं फडणवीस यांनी सांगितले. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास आदी ध्येयांवर हा अर्थसंकल्प आधारीत असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

 

* प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर

* नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष ६ हजार रुपये राज्य सरकार देणार

* केंद्राचे ६ हजार आणि राज्याचे ६ हजार असे १२ हजार प्रतिवर्ष मिळणार

* या योजनेचा १ कोटी १५ लाख  शेतकरी कुटुंबांना लाभ

*६ हजार ९०० कोटी रूपयांची भार राज्य सरकार उचलणार

Protected Content