पाचोऱ्यात सण – उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रुट मार्च

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | श्री गणेश उत्सव व आगामी सण उत्सव यामध्ये कोत्याही प्रकारचे विघ्न येवू नयेत या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी रूट मार्च केला.

 

आगामी विविध सामाजिक सणात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शक्ती प्रदर्शन करून शहराच्या मुख्य रस्त्यांवर रूट मार्च काढला.

पाचोरा शहरात रॅपिड अॅक्शन फोर्सच्या पोलीस अधिकाऱ्यांची दोन वाहने सह त्यात आर. ए. एफ. जवानांचे दोन प्लाटून, राज्य राखीव दलाची एक तुकडी यांचा फौजफाटा विविध प्रकारची वेपन, बंदुका, काठ्या, लाठ्या घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाला. शहरात पोलिस प्रशासनाचा फौजफाटा पाहून नागरिक स्तब्ध झाले होते. कोरोना आपत्तीच्या दोन -अडीच वर्षात जनतेला कोणतेही सण साजरे करण्याचा शासनाकडून बंदी घालण्यात आली होती. परंतु, आता कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने सर्व सामाजिक सण – उत्सव साजरे करण्याची बंदी उठविल्याने जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणपती उत्सवाच्या निमित्ताने  कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कुठलीही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पथकांचे शक्ती प्रदर्शन शहराच्या गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावरून  रूट मार्च काढण्यात आला. रूट मार्चला पाचोरा पोलिस स्टेशन येथुन सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरपालिका चौक, देशमुख वाडी, व्ही. पी. रोड, पंचमुखी हनुमान मंदिर, आठवडे बाजार, गांधी चौक, जामनेर रोडहुन परत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समाप्त करण्यात आला. हा रूट मार्च कामी आर. ए. एफ. चे शशी रॉय यांचे सह ९० आर. ए. एफ. जवान, तसेच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, ए. पी. आय. राहुल मोरे, पी. एस. आय. गणेश चोभे, योगेश गणगे, पी. एस. आय. विजया वसावे व प्रो. पी. एस. आय. जितेंद्र वल्टे यांच्यासह पाचोरा पोलिस स्टेशनचे २० पोलिस कर्मचारी, एस. आर. पी. एफ. चे १ सह २० व होमगार्ड ३५ स्थानिक पोलिस यांचा रुट मार्चमध्ये समावेश होता.

 

Protected Content