खाशाबा अपंग क्रीडा प्रशिक्षण संस्थेत नव्या पाऊल वाटा’ यावर व्याख्यान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत खाशाबा अपंग क्रीडा प्रशिक्षण संस्थेचे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जळगाव आणि विद्यार्थी विकास विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित एक दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

 

या व्याख्यानाचे उदघाटन सिनेट सदस्या स्वप्नाली महाजन (काळे) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील, विद्यापीठाच्या विभागप्रमुख  डॉ.मुक्ता महाजन प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी ॲड.संध्या किशोर, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक, कनिष्ठ महावि्यालयाचे प्राचार्य उमेश इंगळे, विद्यार्थी विकास अधिकारी हितेश ब्रिजवासी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

 

कार्यक्रमाच्या सुरवातीला हितेश ब्रिजवासी यांनी प्रास्ताविकेतून आयोजनाबद्दल माहिती दिली तर प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांनी आपल्या मनोगतातून महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले. तर कार्यक्रमाचे उदघाटक स्वप्नाली महाजन (काळे) यांनी विद्यार्थिनींना समाजातील नकारात्मकता विचारात न घेता स्वकर्तुत्वाने आपले ध्येयगाठा असा संदेश दिला. तर विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभाताई पाटील यांनी आजच्या व्याख्यानातून जे ही मार्गदर्शन, प्रेरणा आणि अनुभव मिळेल तो आपल्या जीवनात अमलात आणून स्वतचे आयुष्य घडवावे तरच आजच्या आयोजनाचा हेतू साध्य होईल असे सांगून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

व्याख्यान दोन सत्रात विभागले गेले असून व्याख्यानाच्या पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित प्रा.डॉ.मुक्ता महाजन यांनी विद्यार्थिनींना महिला सक्षमीकरण आणि लैंगिक संवेदनशीलता या विषयावर मार्गदर्शन केले तर  दुसऱ्या सत्रात ॲड. संध्या किशोर, समुपदेशक यांनी घेवूया मनाची काळजी या विषयांवर मार्गदर्शन केले. उपस्थित विद्यार्थिनींनी देखील यावेळी विविध प्रश्न मांडून शंकेचे निरसन केले. यावेळी विवेकानंद प्रतिष्ठान मधील सेविका सरला हतागडे यांच्या (१२ ग्रॅम सोन्याचा मंगळसूत्र सापडल्यावर संबंधित महिला शिक्षिकेस सुखरूप परत केल्या बद्दल) प्रामाणिक सेवेबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच महाविद्यालयातील महिला शिक्षकांचे देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तर समारोप सत्रात व्याख्यानास उपस्थित सर्व विद्यार्थिनींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर चौधरी यांनी तर पाहुण्यांचा परिचय हितेंद्र सरोदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यस्वितेसाठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. हितेश ब्रिजवासी, मुरलीधर चौधरी, हितेंद्र सरोदे, सुनील बारी, कल्पना पाटील,  आशा पाटील,  वैजयंती चौधरी, डॉ. संतोष बडगुजर, सुनील बारी  आदींनी सहकार्य केले तर प्राचार्य किशोर पाठक यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content