फैजपूर येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार सोहळा

faizapur 1

 

फैजपूर प्रतिनिधी । बजरंग आटो गॅरेज येथे दिव्यांग सेनेतर्फे (दि.६) जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध दैनिकातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सर्व पत्रकारांचा उपस्थितीत हा सोहळा मोठया उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचा सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून पत्रकारांचा डायरी, पेन, गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी दिव्यांग सेना फैजपूरचे शहराध्यक्ष नितिन महाजन, तालुका अध्यक्ष नाना मोची, सचीव मुन्ना चौधरी, तालुका सचीव राहूल कोल्हे, कार्याअध्यक्ष संजय वानखेडे, ललित वाघुळदे, वैभव मेढे, विनोद बिराडे यांच्यासह सोहळ्याला शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सराफ तर आभार नितीन महाजन यांनी मानले.

Protected Content