शेतकऱ्यांशी सरकारची आजची चर्चाही निष्फळ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । शेतकऱ्यांची केंद्र सरकारसोबत सुरु असलेली आजची बैठकही संपली आहे. या बैठकीतही काहीही तोडगा निघालेला नाही. आता पुढची बैठक ९ डिसेंबरला होणार आहे.

चर्चेची पुढची फेरी ९ डिसेंबरला होणार आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाचा आजचा दहावा दिवस आहे. ९ तारखेला दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा चर्चा केली जाणार आहे. हरयाणा, पंजाबमधले शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन ठेपले आहेत. तिथे ते आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

दरम्यान ठोस तोडगा निघेपर्यंत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा दिला आहे. इतकंच नाही तर केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत म्हणून ८ डिसेंबरला शेतकऱ्यांनी एक दिवसाच्या भारत बंदचीही हाक दिली आहे.

Protected Content