अर्णब गोस्वामींवर दोषारोपपत्र दाखल; 16 डिसेंबरला सुनावणी

 रायगड । रिपब्लिक भारत टिव्हीचे संपादक अर्णब गाेस्वामी यांच्यासह नितेश सारडा आणि फिराेज शेख यांच्या विराेधात सुमारे 1914 पानांचे दोषारोपपत्र रायगड पोलिसांनी दाखल केले होते. त्यावर 16 डिसेंबर रोजी अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी शुक्रवारी रिपब्लिक वृत्त वाहिनीचे समुह संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह नितेश सारडा आणि फिरोज शेख यांच्या विरोधात सुमारे १९१४ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर आता १६ डिसेंबर रोजी अलिबागच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या समोर होईल.  

प्रसिध्द वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्तेचा ठपका गोस्वामी, सारडा आणि शेख यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तर सारडा आणि शेख यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आधीच दाखल केलेला जामिन अर्ज शनिवारी मागे घेतला आहे. 

दरम्यान, गोस्वामी, सारडा आणि शेख यांच्या विरोधातील पुनर्निरीक्षण अर्जावरील निर्णय जिल्हा सत्र न्यायालय आज देण्याची शक्यता होती. मात्र न्यायालयाने आता १९ डिसेंबर २०२० तारीख दिली आहे. अशी माहिती जिल्हा सरकारी वकील अॅड. भूषण साळवी यांनी दिली.                          

तसेच गोस्वामी, सारडा आणि शेख यांनी त्याकडे केलेल्या कामाची रक्कम नाईक यांना दिली नाही. त्यामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. नाईक यांना आत्महत्या करण्यास आरोपींनीच प्रवृत्त केल्याचे दोषारोपपत्रात पोलिसांनी नमुद केले आहे, असेही अॅड.साळवी यांनी स्पष्ट केले. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी सुमारे १ हजार ९१४ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात शुक्रवारी दाखल करताना अन्वय नाईक यांनी गोस्वामी, सारडा आणि शेख या आरोपींचे वास्तुसजावटीचे काम केल्याचे स्पष्ट केले आहे.

Protected Content