शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी प्रवृत्त्तीच आंदोलनामागे — खासदार उन्मेष पाटील ( व्हीडीओ )

 

 

जळगाव : प्रतिनिधी | शेतमाल बाजारव्यवस्थेत सुधारणा करून शेतकऱ्यांना संरक्षण देणारे नवे कृषी कायदे असले तरी शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी प्रवृत्त्तीच आंदोलनामागे आहे असा आरोप आज खासदार उन्मेष पाटील यांनी केला .

भाजप कार्यालयात वार्ताहरांशी बोलतांना खासदार उन्मेष पाटील पुढे म्हणाले की वास्तवात केंद्र सरकारचे हे कायदे क्रांतिकारी आहेत त्यामुळे विरोध करणारांनी विरोध थांबवावा शेतकरी नेते म्हणून या कायद्यांना विरोध करणारी वृत्तिच शेतकऱ्यांना फसवत आहे राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीच्याच करार शेती आणि खाजगी बाजार समित्या सुरु केल्या हे ते का सांगत नाहीत ? नव्या कायद्यातील करार हा शेतीचा नाही शेतमालाचा आहे मात्र शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जातील असा गैरसमज पसरवला जातोय तो गैरसमज पसरावणारेच शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत बाजार समित्या कायम ठेऊन त्यांना पर्यायी व्यवस्था देणे हि नव्या कृषी कायद्यातील तरतूद आहे त्यानंतर शेतकरी त्याला पाहिजे तेथे शेतमाल विकू शकणार आहे नव्या कृषी कायद्यामुळे अन्नप्रकिया उद्योगाला चालना मिळून शेती क्षेत्रातच रोजगार निर्मिती वाढणार आहे पंजाब आणि हरियाणा या राज्यात १० टक्के शेतकऱ्यांकडून जे कमिशन दलाल कमावतात तो आकडा २२ हजार कोटींचा आहे त्यांची दलाली जाणार असल्याने ते शेतकऱयांची दिशाभूल करून आंदोलन चिघळवत आहेत बाजार अनित्य आणि राज्य सरकारचा मोठा महसूल पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये या कायद्याने गोत्यात येऊ शकतो म्हणून काही लोक चुकीच्या पद्धतीने वातावरण बिघडवत आहेत अशा लोकांनीच हे आंदोलन पुढे केले आहे . अनेक कायद्यांमध्ये सुधारणा केल्या जातात तशी गरज पडली तर नव्या कृषी कायद्यात अंमलबजावणी करताना शेतकरी त्रासात सापडत असतील तर पुन्हा सुधारणा चर्चेतून करता येऊ शकणार नाही का? हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे , असेही ते म्हणाले
,
यावेळी भाजपचे ग्रामिक जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे , महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी , महापौर भारती सोनावणे , उप महापौर सुनील खडके , नगरसेवक कैलास सोनावणे आढी उपस्थित होते

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/406852047177677

Protected Content