शेतकर्‍यांची अवस्था बीएसएनएल कंपनी प्रमाणे होणार – सतेज पाटील

 

कोल्हापूर । नव्या कृषी कायद्यातून शेतकर्‍यांचा कसलाही लाभ होणार नाही. अंबानीची जिओ कंपनी सुरू झाल्यावर शासकीय बीएसएनएल दूरध्वनी कंपनी देशोधडीला लागली. तशीच अवस्था शेतकर्‍यांची या विधेयकामुळे होणार असल्याची टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे.

सध्या शेतकर्‍यांच्या आंदोलनास विविध पक्षांनी पाठींबा दिला आहे. या पार्श्‍वभूमिवर, कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपा शेतकरी विरोधी असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. कृषी कायद्यात बद्दल होणार नाही, हे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे विधान हे याचीच साक्ष देत असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या नेत्यांनी गळ्यात पक्षाचा मफलर घालून शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन सांगण्याची हिंमत दाखवावी. त्यावर शेतकरीचं त्यांना पायातील काढून उत्तर देतील, अशी टीका त्यांनी केली.

सतेज पाटील पुढे म्हणाले की, नव्या कृषी कायद्यातून शेतकर्‍यांचा कसलाही लाभ होणार नाही. अंबानीची जिओ कंपनी सुरू झाल्यावर शासकीय बीएसएनएल दूरध्वनी कंपनी देशोधडीला लागली. तशीच अवस्था शेतकर्‍यांची या विधेयकामुळे होणार आहे, असा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे. शेतकरी कायद्यामुळे कार्पोरेट कंपन्या पळून जाण्याचा धोका आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसचा उद्याच्या देशव्यापी बंदला पाठिंबा देणार आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

त्यासाठी शेतकर्‍यांनी घर, शेत, बांधावर काळा झेंडा लावावा. लोक रस्त्यावर आल्यावर भाजपाचे सरकार घाबरत नाही, पण सोशल मीडियावर टीका व्हायरल झाली की बैचेन होतात. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते, नागरिकांनी उद्या मोबाइलवर निषेधदर्शक काळा डीपी लावावा, असे आवाहन त्यांनी केले.

Protected Content