शेतकरी विरोधी कायदे रद्द करा ; आपची मागणी

चोपडा, प्रतिनिधी । केंद्राने राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी आंदोलनाच्या मागण्या मंजूर करून तिन्ही कायदे रद्द करण्यात यावे व विविध ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत अशा आशयाचे निवेदन आम आदमी पार्टीतर्फे तहसीलदारांना देण्यात आले.

केंद्र सरकारकडून संसदेत शेती विधेयक पारित केल्यापासून संपूर्ण देशात हे तिन्ही कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी, विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करीत आहेत. आतापर्यंत आपल्या सरकार कडून या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आता देशातील शेतकरी संघटना राष्ट्रीय पातळीवर दिल्लीमध्ये आंदोलन करण्यासाठी येत आहेत. यांच्या मागण्या शेतकरी हिताच्या असून आपण पारित केलेले शेतकरी विरोधी विधेयक मागे घेण्यात यावे. या आंदोलनांत आम आदमी पार्टी चोपडा पूर्णपणे सहभागी आहे. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत तातडीने बैठक घेवून सकारत्मक निर्णय घेवून शेतकरी विरोधी तिन्ही कायदे रद्द करावेत आणि विविध ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केसेस लावण्यात आल्यात त्या मागे घ्याव्यात असे निवेदन तहसीलदार यांना आपचे जिल्हा सचिव रईस खान, सहसंयोजक विठ्ठलराव साळुंखे, राजमल पाटील, प्रल्हाद साबळे, शांताराम साबळे, रेजल बारेला, सैय्यद फैजान, हय्युम खान व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content