जळगाव प्रतिनिधी । शहरातील काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या कायदा विरोधात जिल्हा काँग्रेस भवनापासून जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील यांच्या उपस्थितीत भव्य ट्रक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.
भाजपा च्या केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकरी विरोधात काळे कायदे संमत केल्याच्या विरोधात आज जिल्हा काँग्रेस भवनापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ट्रॅक्टर रॅली काढून आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हा निरीक्षक प्रकाश मुगदिया, प्रदेश सचिव डी.जी. पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, प्रदीप पवार, अशोक खलाने, ज्योत्स्ना विसपुते, सुलोचना वाघ, प्रभाकर सोनवणे, अविनाश भालेराव, राजेश कोतवाल, श्याम तायडे, जाकीर बागवान, अमजद पठाण, दीपक सोनवणे, मुजिब पटेल, बाबा देशमुख, आत्माराम जाधव, जगदीश पाटील, आसिफ शेख, ज्ञानेश्वर महाजन, विवेक ठाकरे, प्रतिभा मोरे, चंद्रकला इंगळे, मनीषा पाचपांडे, अजाबराव पाटील, सुरेश पाटील, के.डी.चौधरी, मनोज सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, जमीन शेख, चंदन पाटील, गौरव सिंग, चव्हाण कदीर खान, जलील पटेल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3039347679502414/
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/427955654865271/