शेगाव नगरपरिषदेने केला ई- बाईकधारकांचा सत्कार

शेगाव, प्रतिनिधी | सर्वत्र ई बाईक वापरण्याबात प्रोत्साहन देण्याकरता जनजागृती करण्यात येत आहे. याच अनुषंगाने शेगाव नगर परिषदेद्वारा माझी वसुंधरा अभियान २ अंतर्गत ई-बाईकधारकांचा सत्कार व व शहरात मोफत चार्जिंग पॉईंट लावण्याकरिता पुढाकार घेतला जात आहे.

 

माझी वसुंधरा अभियान २ अंतर्गत शेगांव नगर परिषद कडून ई-बाईकधराकांचे सत्काराप्रसंगी आरोग्य विभागाचे अधिकारी मोकासरे यांनी पर्यावरण विषयक माहिती दिली. यात त्यांनी सांगितले की, ओझन वायू पर्यावरणातील उपयुक्त वायू आहे. ज्यामुळे समतोल राखण्यास मदत होते. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. झाडे लावा झाडे जगवा ,पर्यावरण पूरक गोष्टीकडे जास्त लक्ष देण्याची आज आवश्यक आहे असे अनेक उपक्रम आपण राबविले पाहिजे. तसेच आपण जे इलेक्ट्रिक वाहन घेतले आहे.त्यामुळे आपण एक प्रकारे पर्यावरण वाचव्याचे काम करीत आहात. पेट्रोलच्या वाहन चालवताना जे प्रदूषण वायू , ध्वनी प्रदुषण अशा प्रदूषण या समस्यांना तोंड द्यावे लागते. पर्यावरण पूरक ई-बाईक वापराने प्रदुषणाला आळा घालू शकतो असे म्हणून त्यांनी उपस्थित ई – बाईकधारकांचे सत्कार करीत आभार व्यक्त केले. याप्रसंगी सोबत नगर परिषद मार्फत आम्ही विनामूल्य चार्जिंग पॉइंट देखील बसविला आहे. हा चार्जिंग पॉईंट नगर परिषद शाळा क्र. ०५ जवळ देण्यात आला तरी आपण याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. तसेच आणखी आम्ही भविष्यामध्ये असेच चार्जिंग पॉइंट बसविणार आहोत. असे नगर परिषद च्या वतीने जाहीर करण्यात आले.. यावेळी काही ग्राहकांनी आपल्या ई- बाईकपासून झालेले फायदे व अनुभव सांगितले. या कार्यक्रमामध्ये वृध्द मंडळी , लहान व्यापारी, शिक्षण घेतलेली विद्यार्थी, महिला वर्ग उपस्थित होते. यावेळी उपस्थितीतानी नगर परिषद व अधिकारी मंडळीचे आभार मानले. याप्रसंगी इलेक्ट्रिक विभागाचे प्रमुख ढवळे तसेच कर्मचारी यांची उपस्थिती होती

Protected Content