शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारत जोडो यात्रेच्या सभेत राहूल गांधी यांनी स्वातंत्र्य विर सावरकर यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्याच्या निषेधार्थ शेगाव येथे होणारी सभा आणि भारत जोडो यात्रेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विरोध करत काळे झेंडे दाखविण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल गांधी यांनी हिंगोलीत बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकरांवरविषयी वादग्रस्त विधानं केली होती. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे, ते इंग्रजांसाठी काँग्रेसविरोधात काम करायचे, त्यांनी दुसऱ्या नावानं स्वत:वरच पुस्तक लिहिलं आणि अंदमानातून सुटका होण्यासाठी त्यांनी इंग्रजांची माफी मागितली असे वादग्रस्त आरोप राहुल यांनी केले. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये काँग्रेसची भारत जोडो यात्रा खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात येणार आहे. यानिमित्ताने जाहीर सभा देखील होणार आहे. राहूल गांधी यांनी केलेल्या चुकीच्या विधानाच्या निषेधार्थ शेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भारत जोडो यात्रेला विरोध करत काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार आहे.