शेखर तडवी यांचा उत्कृष्ट कर्मचारी व कोरोना योद्धा म्हणून गौरव

 

यावल, प्रतिनिधी ।  कोरोना विषयी जनजागृती करण्याकामी प्रशासकीय पातळीवर योग्य ती काटेकोर दखल घेतली आणि शासनाच्या नियमांना स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातुन सर्व सामान्य नागरीकांपर्यंत कोरोनाबाबत जागृत राहुन योगदान दिले अशा यावल तालुक्यातील महसुल प्रशासनाच्या सेवेत कार्यरत असलेले शेखर तडवी यांना उत्कृष्ट कर्मचारी व कोरोना योद्धा अशा दोन सन्मानपत्राने सन्मानीत करण्यात आले आहे.

विभागाचे प्रांत अधिकारी डॉ . अजीत थोरबोले यांच्या पुढाकाराने या प्रशासकीय सेवेकरींना सन्मानपत्र देवुन सन्माननित करण्यात आले . यावलच्या तहसील कार्यालयातील सभागृहात १५ ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार जितेन्द्र कुवर हे होते तर निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार तसेच यावल पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण आदी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.

यावेळी कोरोना विषाणु महामारीच्या आपत्तीमध्ये सामाजीक बांधीलकी जपत आपल्या कार्याच्या माध्यमातुन जनसामान्यांची संकटाप्रसंगी जनजागृती करण्यासाठी व कोरोना विरूद्धचा लढा जिंकण्यासाठी जिव धोक्यात घालुन कार्यकेल्याबद्दल शेखर तडवी यांचा तहसीलदार जितेन्द्र कुवर व प्रभारी पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्रे देवुन सन्मान करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांनी मानले.

Protected Content