Home धर्म-समाज जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर

जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर

0
44


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महसूल विभागाचे तलाठी, ग्रामसेवक सर्व शासकीय कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर जात आहेत.

कुठल्याही शासकीय काम न करता संपात सहभागी होण्यासाठी तसेच संप यशस्वी करण्यासाठी पाचोरा तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी बंधू – भगिनी यांनी १४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमून प्रशासनास निवेदन देण्यासाठी एकजुटीने न चुकता जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी हजर राहावे. “आता नाही तर कधीच नाही” युक्तीप्रमाणे सर्वांनी संपात सहभागी व्हावे असे आवाहन सर्व संघटनातर्फे करण्यात येत आहे. या संपात जवळपास सर्वच कर्मचारी सहभागी होणार आहेत.


Protected Content

Play sound