शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जन्मदिनीचे औचित्य साधून आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे मोफत वाटप सुरु करण्यात आले आहे. या गोळ्या वाटपाची सुरवात आज शेंदूर्णी येथिल गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल येथे एका कार्यक्रमात करण्यात आली.
गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल येथे आयोजित होमिओपॅथी गोळ्यांचे वाटपप्रसंगी मुंबई येथील गायक पी.गणेश यांची खास उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील डॉ.अहमद शरीफ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात मनसे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विजयानंद कुळकर्णी, मनसे महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष व गुरुकुल मुख्याध्यापिका डॉ.सौ.भक्ती कुळकर्णी, गुरुकुल स्कुल सीईओ वेदांत कुळकर्णी, नगरपंचायत स्वीकृत सदस्य श्रीकृष्ण चौधरी, शेंदूर्णी शिवसेनेचे संजय सूर्यवंशी, रवी पवार , सुनील गुजर, राष्ट्रवादीचे संदीप जावळे, अजय निकम, योगेश गुजर ,फारूक खाटीक, मनसेचे विनोद गुजर ,नवलसिंग जाधव, दीपक राजपूत, नितीन गुजर यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्सेनिक अल्बम ३० या रोग प्रतिकार शक्ती वर्धक होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. शेंदूर्णी नगरपंचायत हद्दीतील सर्व वार्डात नगरसेवक व कार्यकर्ते यांच्यामार्फत सर्व नागरिकांना या गोळ्यांचे ३ दिवस घरपोच वाटप करण्यात येणार असल्याचे डॉ.विजयानंद कुळकर्णी यांनी सांगितले आहे. कार्यक्रमासाठी गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुलचे लिपिक अश्फाक देशमुख सर्व शिक्षक, शिक्षिका, व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.