धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील खत्री गल्ली परिसरातील ‘त्या’ कोरोनाचा संशयिताचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली आहे. यामुळे धरणगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शहरातील खत्री गल्ली परिसरातील एका संशयिताला काही दिवसापासून निमोनियाची लक्षणं होती. परंतू प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत, हायरिक्स संपर्कात आलेल्या ११ जणांना धरणगाव महाविद्यालयातील कोविड १९ विशेष कक्षात क्वारंटाईन केले होते. ११ जणांमध्ये ९ सदस्य परिवारातील तर अन्य २ जण आहेत. या संशियातला अमळनेर प्रवासाची हिस्ट्री असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे धरणगावकर चिंतेत पडले होते. परंतु सुदैवाने या संशयिताचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे धरणगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. अहवाल निगेटिव्ह आला असला तरी, नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.