डोंगर कठोरा येथे डेंग्युचा रुग्ण; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

यावल  प्रतिनीधी । तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज डेंग्युचा रुग्ण आढळुन आल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

येथे आढळलेला डेंगूचा रुग्ण हा इयत्ता ६ वि च्या वर्गात शिक्षण घेणारा विद्यार्थी असुन या डेंग्यु रुग्णाचे वय १२ वर्ष असुन , गावात अशा प्रकारे डेंग्युचा रुग्ण आढळुन आल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असुन या प्रकारामुळे गावातील पाल्यांमध्ये आपल्या चिमकुल्या बाळांच्या आरोग्याला घेवुन चिंतेचे सावट पसरले आहे .आरोग्य यंत्रणेचे या गावात दुर्लक्ष  केले जात असल्याची ओरड ग्रामस्थाकडुन करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातुन गावात वेळो-वेळी जनजागृती करीता आरोग्य शिबीर घेण्यात यावे असे शासनाचे आदेश असतांना कुठल्याही प्रकारची शिबीरे घेण्यात येत नाहीत.

गावातील लोकांना व्हिट्यामिनच्या देखील गोळ्या वाटप करण्यात येत नाही. तसेच येथील उप केंद्रात कोणत्याही प्रकारची गोळ्या औषधी उपलब्ध राहत नसल्याने ग्रामस्थांचे आरोग्य हे रामभरोसे आहे. निवासी नर्स ANM हे उप केंद्रात राहत नाही रात्री अपरात्री डिलिव्हरीचे पेशन्ट मोठया प्रमाणावर अडचणीना सामोरे जावे लागत असुन , ग्रामस्थांना खूप त्रास सहन करावा लागतो , तरी  संबधित अधिकारी यांनी तात्काळ  गावात जनजागृती करून युद्धपातळीवर स्वच्छता अभियान राबवावे , दरम्यान सदर ग्रामपंचायत ग्रामसेवक यांचे गावाच्या विकासाकडे व लोकांच्या आरोग्या कडे दुर्लक्ष होत आहे  गावात  वेळो वेळी निर्जतुकीकरणाची फवारणी होत नाही  तसेच पिण्याच्या पाण्यात  TCL पावडर पण लवकर टाकली जात नाही  तरी सदर  अधिकारी  यांनी  याकडे लक्ष देऊन काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 

Protected Content