जळगाव, प्रतिनिधी । शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा उपक्रम राज्यभरात राबवण्यात येत असून शिवसेना जळगाव महानगरतर्फे शिवसेना कार्यालयाजवळ सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला
मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. आज शिवसेना कार्यालयाजवळ सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, विधानसभा संपर्क प्रमुख समाधान पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, महानगर संघटक दिनेश जगताप, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर विष्णू भंगाळे, गटनेते बंटी जोशी, नगरसेवक नितीन बरडे, मनोज चौधरी, खुबचंद साहित्या ,अंकुश कोळी आदी उपस्थित होते.
यावेळी संपर्क प्रमुख संजय सावंत बोलतांना म्हणाले की जनतेच्या प्रश्नांची जाण शिवसेनेला नक्कीच आहे. जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यात पक्षाची भूमिका नेहमी सकारात्मकच राहिली असल्याने शिवसेनेकडे सामान्य माणसासोबतच युवकांचाही ओघ वाढला आहे. जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
यशस्वितेसाठी अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जकीर पठाण, उप महानगर मानसिंग सोनवणे, प्रमुख प्रशांत सुरळकर, कोमेश सपकाळे, जितू साळुंखे, गणेश गायकवाड, पूनम राजपूत, दीपक कुक्रेजा, विराज कावडिया, अमित जगताप, ईश्वर राजपूत, वसीम खान, विजय बांदल, विजय राठोड, इकबाल शेख, विकास पाटील, अजय ठाकूर, अक्षय सोनवणे, मंदार सोनवणे, भिकन चौधरी, राहुल पावसे, विपुल शंखपाळ आदींनी परिश्रम घेतले.