नितीशकुमार यांनी केली राजकीय वारसदाराची घोषणा

 

 

पाटणा : वृत्तसंस्था । आपल्या धक्कादायक निर्णयांसाठी ख्यात असणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पक्षाचे खासदार रामचंद्र प्रसाद सिंग यांना राजकीय वारसदार जाहीर करून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

नितीशकुमाऱ हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असले तरी त्यांना निवडणूक खूप कठीण गेली. त्यांच्या जागा देखील लक्षणीय प्रमाणात घटल्या. हरण्याची चिन्हे दिसू लागताच नितीशकुमारांनी थेट निवृत्तीचेच का़र्ड खेळले. यानंतर ते कधी वारसदार जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

या पार्श्‍वभूमिवर आज पटनामध्ये जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु असतांना अचानक नितीशकुमारांनी राज्यसभा खासदार रामचंद्र प्रसाद सिंह यांच्या नावाची घोषणा केल्याने सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला. नितीशकुमार यांनी आरपीसी यांना जदयूचा नवा अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला. याला सर्व सदस्यांनी होकार दिला.

Protected Content