शिवप्रेमींवर दाखल गुन्हे मागे घ्या; विविध संघटनांचे निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात नुकतेच शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूक व रॅली काढणाऱ्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी आज विविध संघाटनांच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १९ फेब्रुवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवशिावजयंती हा शिवभक्तांच्या श्रध्देचा विषय आहे. यावर्षी कोविड-१९ मुळे प्रशासनाने हा उत्सव कमी नागरीक व शिवप्रेमींच्या उपस्थितीत साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतू शिवजयंती हा शिवभक्तांचा श्रध्देचा प्रश्न असून शिवजयंती साजरी करणे हा गुन्हा नाही. त्यामुळे काही शिवप्रेमींवर शिवजयंती साजरी करतांना रॅली काढली होती अशांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी विविध संघटनांच्या वतीने आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. 

या निवेदनावर मोरया प्रतिष्ठान, अखिल भारतीय युवक महासंघ, अखिल भारतीय छावा संघटना, युवासेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह हर्षवर्धन खैरनार, मयूर विसावे, अबोली पाटील, मनोज बाविस्कर, धीरज पाटील यांची उपस्थिती होती.

https://www.facebook.com/508992935887325/videos/930775657460703

 

Protected Content