मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी दसर्याला शिवतीर्थ मैदानावर शिवसेनेचाच मेळावा होणार असल्याची घोषणा उध्दव ठाकरे यांनी केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सत्ताधार्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी ‘दसरा मेळावा’ हा शिवसेनेचाच होणार आणि तेही शिवतीर्थावरच होणार असं उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
शिवतीर्थावर दरवर्षी होत असलेला दसरा मेळावा यावर्षी कुणाचा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना शिंदे गट आणि शिवसेनेनेही मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती पण अद्याप पोलिसांकडून कुणालाच परवानगी देण्यात आली नाही. यातच आता उध्दव ठाकरे यांनी मेळावा होणारच असे घोषीत केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.