यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारत सरकारच्या युवा व खेल मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र विभागामार्फत उत्कृष्ठ युवा स्वयंसेवक पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील ३ युवक युवतींना मिळाला. यात यावल तालुक्यातील शिरसाड ग्रामपंचायतचे युवा सदस्य तथा राष्ट्रीय युवा स्वयंसेवक तेजस धनंजय पाटील यांना जिल्हास्तरीय तिसऱ्या क्रमांकाचा युवा पुरस्कार संविधान दिनाचे औचित्य साधून प्रदान करण्यात आला.
कार्यक्रम कवीयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात सामाजिक विज्ञान प्रशाळेच्या सभागृहात मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एस. टी.इंगळे सर उपस्थित होते. यासोबत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव येथील न्यायाधीश एस.ए.कुलकर्णी मॅडम, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य मॅथ्यु अब्राहम, एनएसएस डायरेक्टर डॉ. सचिन नांद्रे, प्रा. अजय पाटील व नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर उपस्थिती होते.
यावेळी संविधान जागर अभियान राबविण्यात आले. तेजस पाटील हे कायमच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांनी स्वच्छ भारत अभियान, फिट इंडिया कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम, क्रीडा व सांस्कृतिक विभागात उल्लेखनीय कामगिरी आजपर्यंत केलेली आहे. यामुळे त्यांना संविधान दिनाचे औचित्य साधून भारत सरकारच्या युवा आणि खेल मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्रामार्फत जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तेजस धनंजय पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.