यावल येथे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांची मार्गदर्शन प्रशिक्षण बैठक

यावल प्रतिनिधी । तहसीलच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयात संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक कशी करावी, यासाठी मतमोजणीपूर्वी तालुका निवडणुक निर्णय अधिकारी तहसीलदार महेश पवार यांच्या प्रमुख उपस्थित  मतमोजणीपूर्व प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन प्रशिक्षण बैठक कार्यक्रम घेण्यात आला.

यावल येथील तहसील कार्यालयाच्या सातोद रोड वरील नवीन प्रशासकीय इमारतीत आज तालुका निवडणुक निर्णय अधिकारी महेश पवार निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, नायब तहसीलदार आर.डी. पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी पुर्वी सर्व २७ निवडणुक निर्णय अधिकारी सचिन जगताप, पि.ए.कडनोर, डी.पी. कोते, ए.एस. खैरनार, एम.डी. पाटील, आर.पी. इंगळे, आर.एस. भंगाळे, एस.ए. तडवी, एम.पी. देवरे, एम.एफ. तडवी, आर.बी. मिस्त्री, के.पी.सपकाळे, एन.पी. वैराळकर, डी.एस. हिवराळे, एस.बी. तायडे, जे.डी. बंगाळे, ए. यु.कदम, पी.आर.कोळी, एस. की.सिनारे, यु.जे. धांडे, एच.एस. कोल्हे, ए.एस. खैरनार, एस. आर. शेकोकार, पी.एस. विसपुते, के. टी. देवराज, एन .एच. तडवी यांनी या मार्गदर्शन प्रशिक्षण बैठकीत सहभाग नोंदविला. दरम्यान उद्या तहसील कार्यालयात ग्रामपंचायत मतमोजणी प्रसंगी कार्यालयाच्या बाहेरील परिसरातुन जाणाऱ्या सातोद कोळवद या मार्गावरील वाहनाची राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र यांच्या आदेशान्वये उद्या दिनांक १८ जानेवारी रोजी मतमोजणी पासुन सायंकाळी ६ वाजेपर्यंत इतरत्र वळविण्यात यावे असे आदेश तहसीलदार महेश पवार यांनी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

Protected Content