मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्र राज्यातून टाटा एअरबस प्रकल्प गेल्यानंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दुसरा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका सुरू झाली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे गुजरात एजंट असल्याची बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील उद्योगधंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला स्थलांतरीत करायचे, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे या ध्येयाने केंद्रातील मोदी सरकार गेल्या ८ वर्षापासून काम करत आहे. राज्यात सत्ताबद्दलानंतर आलेले शिंदे फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. एक दिवस हे सरकार मुंबई ही गुजरातला देऊन टाकतील. असा घाणाघाती टिका देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. देशातील सर्वात जास्त मोठे उद्योग महाराष्ट्रात आहे. गुजरात महाराष्ट्राच्या मागे आहे याचे शल्य पंतप्रधान मोदींना आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प आणि संस्था गुजरातला हलवण्याचा सपाटा लावला आहे.