जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शासन परिपत्रकानुसार २८ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन २८ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात यावा असे शासन परिपत्रक आहे. यानुसार आगमी २८ सप्टेंबर पासून जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस शासकीय कार्यालयात साजरा करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कोल्हे , शहर संघटक नरेंद्र सपकाळे , रावेर तालुका अध्यक्ष महेश लोखंडे , चोपडा तालुका अध्यक्ष गुणवंतराव सोनवणे , जळगाव शहर प्रचार प्रमुख राजेश खडके , जळगाव शहर सह प्रचार प्रमुख चंद्रकांत श्रावणे, जळगाव तालुका संघटक भिकन चौधरी , तालुका उप प्रचार प्रमुख विठ्ठल भालेराव आदि कार्यकर्ते उपस्थित होते .