Home क्राईम भंडाऱ्यात जेवायला बसण्यावरून एकावर तीक्ष्ण वस्तूने वार

भंडाऱ्यात जेवायला बसण्यावरून एकावर तीक्ष्ण वस्तूने वार

0
104


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे पंगतीत जेवायला बसण्याच्या कारणावरून एकाला तिघांकडून तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी २ ऑक्टरेबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुवन प्रभाकर पाटील (वय-४९) रा. वडनगरी, ता.जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी १ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता देवीच्या भंडाऱ्याचा कार्यक्रम वडनगरी गावात ठेवण्यात आला होता. त्यावेळी गोरख गुलाब गायकवाड, दिपक गुलाब गायकवाड आणि शंकर पंडीत भिल सर्व रा. वडनगरी ता.जि.जळगाव हे रस्त्यावर जेवनासाठी बसलेले होत. त्यावेळी भुवन पाटील यांनी तिघांना पंगतीत जेवणाला बसण्याचे सांगितले. याचा राग आल्याने तिघांनी भुवन पाटील यांला बेदम मारहाण करून तिक्ष्ण हत्याराने हाताच्या मनगट्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी रविवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता भुवन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोरख गुलाब गायकवाड, दिपक गुलाब गायकवाड आणि शंकर पंडीत भिल सर्व रा. वडनगरी ता.जि.जळगाव यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सतिष हाळनोर करीत आहे.

 

 


Protected Content

Play sound