घरकुलसाठी लाभार्थ्यांचे उपोषण; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

जळगाव-राहूल शिरसाळे । पंतप्रधान आवास योजनेच्या यादीत नाव असून देखील योजनेच्या घरकुल लाभापासून अधिकाऱ्यांनी वंचित ठेवले आहे. घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील रविंद्र कोळी यांनी सोमवारी १२ सप्टेंबर रेाजी सकाळी ११ वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

रविंद्र पांडूरंग कोळी यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रका म्हटले आहे की, पंतप्रधान आवास योजना ही केंद्र सरकारची असून या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला घरकुल योजना देण्यात येते. यासाठी शासनाच्या नियमा व अटी लागू आहे. या अनुषंगाने चोपडा तालुक्यातील रहिवाशी रविंद्र पांडूरंग कोळी यांनी देखील पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळावे यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर घरकुल योजनेत रविंद्र कोळी यांचे नाव देखील आले. घरकुल मिळावे यासाठी त्यांनी अनेक वेळा स्थानिक पातळीवर निवेदन व अर्ज केले आहे. परंतू अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांना अद्यापपर्यंत घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येवून घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी सोमवारी १२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता रविंद्र कोळी हे उपोषणाला बसले आहे.

 

Protected Content